तिवारी गजानन महाराज मंदिराची स्थापना श्रीगजानन महाराजांच्या समाधी तिथीच्या अर्थात ऋषीपंचमीच्या सुमुहूर्तावर, दि.७ सप्टेंबर १९९७ रोजी श्रीगजानन महाराजांच्याच आज्ञेप्रमाणे मंदिराचे मालक व श्रीगजानन महाराज सेवा ट्रस्टचे संस्थापक श्री.जयवंत नंदकिशोर तिवारी यांनी स्वतःचे राहते घर पाडून, कोणत्याही प्रकारची देणगी वा वर्गणी न घेता स्वखर्चाने केली. हे संपूर्ण मंदिर श्री.जयवंत नंदकिशोर तिवारी यांच्याच खाजगी मालकीहक्काचे असून मंदिराचा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्राशी, व्यक्तीशी, देणगीदाराशी व संस्थानाशी संबंध नाही. मंदिर कोणत्याही प्रकारची देणगी, वर्गणी स्वीकारत नाही. मंदिराचा जिर्णोद्धार हा १९९७ पासून तीन वेळा स्वतः श्री.जयवंत नंदकिशोर तिवारी आणि ट्रस्टतर्फे करण्यात आला. दि.१० फेब्रुवारी २०१९ रोजी वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर महाराजांच्या मंदिरावर सुवर्ण कलशारोहण शेगाव संस्थानचे पौरोहित्य प्रमुख श्री.पोपटगुरू चौथाईवाले यांच्या अधिपत्याखाली सर्व धार्मिक विधी व मंत्रोच्चाराने संपन्न करण्यात आले. दरवर्षी मंदिरातर्फे श्रीगजानन महाराजांचे प्रगटदिन, गुरुपौर्णिमा आणि ऋषीपंचमी अर्थात मंदिराचा वर्धापनदिन असे तीन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. या उत्सवास महाराजांचे असंख्य भक्त दर्शनास, महाप्रसादास उपस्थित राहतात